Ad will apear here
Next
टेन पर्सेंट
गावाकडे शिक्षणाचे वारे वाहू लागले तसे तेथील शिक्षित शहरात कामासाठी येऊ लागले. मराठवाड्यातील शिवा रामा पाटील हाही बीएस्सीच्या जोरावर कामासाठी मुलाखती देऊ लागला; पण कधी मुलाखतकाराकडून नकार, कधी कमी पगार म्हणून शिवाचा नकार असे चालत असतानाच तो सेंट्रॉन कंपनीत पोचतो; पण तेथेही रिटेनर म्हणूनच कामे मिळतात. कायमस्वरूपी नोकरी मात्र मिळत नसल्याने आणि आज तेथे तर उद्या कुठे हा प्रश्न असल्याने तो नैराश्येने ग्रासतो. 

त्यातून बाहेर पडत सेंट्रॉनच्या साहेबांच्या सल्ल्याने स्वतःची कंपनी काढून प्रशिक्षण वर्ग सुरू करतो. त्याला प्रतिसादही चांगला मिळतो; पण हे काम सरळ, सोपे नसते. त्यात ‘टेन पर्सेंट’चा हात असतो. सरकारी असो व खासगी कंपनीचा अधिकारी, कर्मचारी हातावर काहीतरी टेकवले, तरच काम सोपे होते, हे आता शिवा शिकलेला असतो. राष्ट्रीय रोजगार योजना त्याच्या मदतीला येते आणि त्याची दशकभराची बेकारी दूर होते. शिवासारख्या हजारो सुशिक्षित बेरोजगार युवकांचे आयुष्य विकास एखंडेपाटील यांनी ‘टेन पर्सेंट’मधून उलगडून दाखविले आहे.

पुस्तक : टेन पर्सेंट
लेखक : विकास एखंडेपाटील 
प्रकाशक : व्हिजन प्लस फाउंडेशन
पाने : ३१८
किंमत : २५० रुपये
     
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZEUCC
Similar Posts
नर्तक मराठवाड्यातील दिनेगावातील शिवा पाटील हा शेतकऱ्याचा मुलगा; पण लहानपणापासून त्याला नृत्याचे वेड. त्यातून धारवाडकर मॅडमची नाराजी पत्करून त्याने भरतनाट्यमचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. जात-पात वृत्तीमधील विषमता यांचा अनुभव घेऊन शिवा पुण्यात बस्तान ठोकतो. अरंगेत्रमचा कार्यक्रम होतो; पण पुढे काय हा प्रश्न उरतोच
रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथेचे अभिवाचन : ‘ऐक.. टोले पडताहेत’ ज्येष्ठ लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे १७ मे रोजी निधन झाले. त्यांच्या गूढकथा हा कायमच रसिकांच्या आवडीचा विषय होता.. ‘ऐक.. टोले पडताहेत’ या त्यांच्या कथासंग्रहातील त्याच शीर्षकाच्या कथेच्या, तनुजा रहाणे यांनी केलेल्या अभिवाचनाचा व्हिडिओ शेअर करत आहोत... ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संग्रहातून..
अगा जे घडलेची नाही श्रीराम बापट यांच्या कथांच्या माध्यमातून मानवी जीवन मानसशास्त्रीय पद्धतीने समोर आले आहे. पौगंडावस्थेतील तरुणांची मनोवस्था ते श्रद्धा-अंधश्रद्धापर्यंत विविध विषय त्यांनी हाताळले आहेत. हे विषय जसे सामाजिक प्रश्न म्हणून समोर येतात, तसेच मानवी मनाची गुंतागुंत म्हणून! एकूण २१ कथांचा हा संग्रह आहे.
शंभल: एखादा पुराणपुरुष अचानक आपल्यासमोर येऊन उभा राहिला, तर काय होईल? असेच काहीसे मनुचे झाले. त्यासाठी मूळ कथाच वाचायला हवी. पौराणिक कथेला वेगळ्या स्वरुपात समोर आणण्याचा प्रयत्न दर्शन देसले यांनी या पुस्तकातून केला आहे. मनु हा या कथेचा नायक. प्राचीन संस्कृतीचा अभ्यास हा त्याचा आवडीचा विषय. संस्कृतीचा शोध घेता-

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language